राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण : २१ जुलैला निकाल
या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीकडून द्रौपदी मुर्मू, तर काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. २१ जुलै या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीकडून द्रौपदी मुर्मू, तर काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. २१ जुलै या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.
या महोत्सवात प्रारंभी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदी अजूनपर्यंत कुणाचीही नियुक्ती केलेली नाही.
भारतीय डाक विभागाने ‘टाटा एआयजी’च्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रतिवर्ष २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात १० लाख रुपयांचे विमा कवच योजना चालू केली आहे. टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही नवीन योजना आणली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरातील सुरक्षानगरमधील झोपड्यांना १७ जुलैच्या मध्यरात्री २ च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये १५ घरे जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पोलिसांनी खान याला अटक करून त्याच्याकडून परवाना बंदूक आणि ८ काडतुसे कह्यात घेतली आहेत. परवाना रहित करण्याची प्रक्रिया चालू आहे.
जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट तालुक्यात १७ जुलैच्या रात्रीपासून सर्वत्र ढगफुटीसदृश पावसामुळे २० गावांत पुराचे पाणी शिरले आहे.
सनातन धर्म अनंत आणि अविनाशी आहे; मात्र पाश्चात्त्यांच्या परंपरांचे अंधानुकरण केल्याने सनातन धर्माची हानी होत आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ शकते.
मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड, हेमलकसा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोलीत पुरामुळे २ सहस्र ३४५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे
कोरोना संसर्गाची दुसरी लाट, तसेच महामंडळातील कर्मचार्यांचा संप यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ प्राप्त करून घेण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.