गडचिरोलीत पूर परिस्थितीमुळे २० जुलैपर्यंत शाळा आणि इतर आस्थापने बंद !

अत्यावश्यक सेवा चालू

गडचिरोली – मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड, हेमलकसा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोलीत पुरामुळे २ सहस्र ३४५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. आणखी दोन दिवस मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे २० जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता शाळा आणि इतर आस्थापने बंद रहाणार आहेत, असे सांगितले.