राज्यातील ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यातील जी ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत नोंद झालेली नाहीत, ती सर्व स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणण्यात येणार आहेत. त्यानंतर या स्थळांची देखभाल पुरातत्व खाते करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

सर्वज्ञ असलेल्या ऋषींचे श्रेष्ठत्व !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’ 

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन

राजस्थानमधील उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

मधाचा सर्वांत मोठा निर्यातदार असलेल्या ऑस्ट्रेलियाला ५५८ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता !

सरकारने जैवसुरक्षा उपायांचा भाग म्हणून मधमाशांच्या वसाहती आता ‘लॉकडाऊन’ केल्या आहेत. हे कीटक येथे ४०० ठिकाणी पसरल्याने ऑस्ट्रेलियाने १ कोटींहून अधिक मधमाशा नष्ट केल्या आहेत. त्यामुळे मधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

चंद्रूला उर्दू भाषा येत नसल्याने त्याची हत्या करण्यात आली ! – आरोपपत्रातील माहिती

एप्रिल २०२२ मध्ये बेंगळुरू येथे चंद्रू या हिंदु युवकाच्या हत्येचे प्रकरण

राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघाचे अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

आश्रम पाहिल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. शुक्ला म्हणाले, ‘‘आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. येथील व्यवस्थापन पुष्कळ उत्तम आहे. आश्रमाला लवकरच दुसर्‍यांदा भेट देण्याची प्रबळ इच्छा आहे.’’ 

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० जुलै या दिवशी सुनावणी होणार !

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय पिठासमोर सुनावणी होईल. या निवाड्यावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सुनावणीमुळे २० जुलैला होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

हिंदु धर्माचा प्रसार केल्यास धर्माधिष्ठित राष्ट्र स्थापन होऊ शकते ! – सौ. गीता अच्युतन्, श्री श्री नारायणीय सत्संग

पालक्काड (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

७५ वर्षीय हिंदु वृद्ध व्यक्तीची तिच्या सुनेचा मुसलमान प्रियकर आणि सहकारी यांच्याकडून हत्या

कविता हिला संपत्तीमध्ये वाटा देण्यात न आल्याने ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. परवेझ याला अटक करतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता.

गेल्या ६ मासांत ‘ॲमेझॉन’चे जंगल मुंबईच्या साडेसहा पट क्षेत्रफळाएवढे नष्ट !

जागतिक तापमानवाढ, हवामान पालट आदी समस्यांनी रौद्र रूप धारण करण्यामागे अशी अनियंत्रित वृक्षतोडच कारणीभूत आहे ! प्रकृतीच्या असमतोलास उत्तरदायी असलेल्या अशा घोडचुकाच मानवाला नष्ट करतील, हे लक्षात घ्या !