सोलापूर, १८ जुलै (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांनतरचे), पत्रकार, विविध पुरस्कारार्थी, यांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येत आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट, तसेच महामंडळातील कर्मचार्यांचा संप यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ प्राप्त करून घेण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. मुदतवाढीमुळे ३१ ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सध्याचे ओळखपत्र चालणार आहे.