गुरु-शिष्‍य नात्‍याचे अनन्‍यसाधारण महत्त्व !

गुरु-शिष्‍य यांतील सर्वोच्‍च नाते शब्‍दातीत ज्ञानापुरते मर्यादित असते. गुरु शिष्‍याला चित्ताच्‍या स्‍तराला नेऊन त्‍याच्‍यावर ज्ञानरूपी गुह्यतेचा चैतन्‍याच्‍या भाषेत संस्‍कार करून त्‍याला मायारूपी भवसागर तरून जाण्‍याचे प्रशिक्षण देतो. गुरु ज्ञानाद्वारे जिवाचा अहं न्‍यून करतो.

गुरूंची आवश्‍यकता का ?

माणूस अंधारात चालत असतांना धडपडतो; परंतु त्‍याने स्‍वतःसमवेत विजेरी घेतल्‍यास तिच्‍यामुळे मार्गावर प्रकाश पसरून त्‍याला मार्ग स्‍पष्‍टपणे दिसतो. गुरु हे विजेरीप्रमाणेच असतात. ते लोकांना अज्ञानाच्‍या अंधारातून पुढे जाण्‍याचे मार्गदर्शन करतात.

नाम हा खरा गुरु कसा ?

नाम हाच जिवाचा खरा गुरु असून नामाची तळमळ जिवाला चैतन्‍य प्रदान करून त्‍याला शिक्षित करते, म्‍हणजे शिष्‍यत्‍वाला नेते, तर सेवा हा शिष्‍यभाव आहे. सेवाभावातून अहं न्‍यून झाल्‍याने शिष्‍यपणाची जाणीव होते. नाम जिवाला शिष्‍यत्‍व प्रदान करते, म्‍हणून ते निर्गुणवाचक आहे, तर सेवा ही सगुण धारणेची आठवण करून देते, म्‍हणून ती सगुणवाचक आहे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली … Read more

कल्‍याणकारी गुरूंची शिष्‍याला पटलेली महती !

शिष्‍याच्‍या जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्‍यसाधारण आहे; कारण गुरूंविना त्‍याला ईश्‍वरप्राप्‍ती होऊच शकत नाही. गुरूंचे भक्‍तवत्‍सल रूप, दयाळू दृष्‍टी, कृपा करण्‍याची माध्‍यमे यांद्वारे त्‍याला गुरूंच्‍या अंतरंगाचे दर्शन घडते.

गुरुकार्याशी एकरूप झालेला शिष्‍य कसा असतो ?

शिष्‍याच्‍या मुखातून रात्रंदिवस श्री गुरुनामाचा मंत्रोच्‍चार सारखा चालू असतो. श्री गुरूंच्‍या वचनावाचून साधकाला दुसरे कोणतेही शास्‍त्र ठाऊक नसते. ज्‍या पाण्‍यास श्री गुरूंच्‍या चरणाचा स्‍पर्श झाला आहे, ते पाणी कसलेही असले, तरी त्‍यात संपूर्ण ब्रह्मांडाची तीर्थे साठवली असून ‘ते सर्व तीर्थांत श्रेष्‍ठ आहे’,

शिष्‍याचे प्रकार : उत्तम, मध्‍यम आणि कनिष्‍ठ !

उत्तमाधिकारी शिष्‍य म्‍हणजे जीवत्‍व प्राप्‍त होऊन दुःख होत असले, तरी शास्‍त्राभ्‍यासामुळे ‘मी जीव नसून खराखुरा शिव आहे’, असा निश्‍चय झाल्‍यामुळे ज्‍याचा अनादी भ्रम गेला आहे; परंतु जीवदशा मावळली नाही आणि शिवत्‍वाची अनुभूती येत नाही, अशा अवस्‍थेत सापडलेला साधक !

शिष्‍याच्‍या पात्रतेनुसार गुरूंनी शिकवणे

परिपक्‍व फळाला चोच मारायला पोपट जसे सिद्ध असतात, त्‍याचप्रमाणे अनुग्रहपात्र शिष्‍यास शिकवून सिद्ध करण्‍यास गुरुही सिद्ध असतात. त्‍यासाठी शिष्‍याच्‍या ठिकाणी शिकण्‍याची उपजत बुद्धी आणि पात्रता लागते. कावळ्‍याला शिकवून तो काय कोकिळेसारखा गाऊ शकेल ?

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या समष्‍टी रूपाप्रति कोटीशः कृतज्ञता !

‘कृतज्ञतेला शब्‍द नसती, असते केवळ कृती ।
कृतज्ञतेची ही कृती दर्शवते तुमची स्‍थिती ॥’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : कृतज्ञता (भाग ३)

प्रसिद्धी दिनांक १२ जुलै २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ११ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !