
नवी मुंबई, १६ जुलै (वार्ता.) – केंद्र सरकारने जीवनावश्यक खाद्यपदार्थांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.)लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारपेठेतील व्यापार्यांनी एक दिवसाचा बंद पाळला होता. ‘सरकारच्या या निर्णयामुळे देशातील ७ सहस्र ३०० बाजारपेठा आणि १३ सहस्र डाळ गिरण्या, १ सहस्र ६०० तांदूळ गिरण्या, ८ सहस्र पिठाच्या गिरण्यांसह ३ कोटी लहानमोठ्या व्यापार्यांना फटका बसणार आहे’, असे धान्य, तांदूळ आणि तेलबिया व्यापारी संघाचे (ग्रोमा) अध्यक्ष शरद मारू यांनी सांगितले.
१८ जुलैपासून याविषयीचा निर्णय देशभरात लागू करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्याला व्यापार्यांनी कडाडून विरोध केला आहे. वस्तू आणि सेवा करामुळे महागाई वाढून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे ‘हा कर मागे घ्यावा’, अशी मागणी या वेळी व्यापार्यांनी केली.
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !