धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्र निर्मिती यांचे बीजारोपण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

हे गुरुमाऊली, हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून आपण ज्या मोहिमा राबवण्याची प्रेरणा दिलीत, त्या  मोहिमा कालांतराने समाजाने उचलून धरल्या आणि त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. हा केवळ चमत्कारच नव्हे, तर यामागे असलेला आपला दैवी संकल्प आणि धर्मशक्ती कार्यरत आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सार्वजनिक उत्सव आदर्शप्रकारे कसे साजरे करावेत ?, हे सांगून या उत्सवांतील जुगार, डिजे, फटाके वाजवणे आदी अपप्रकारांच्या विरोधात मोठी जनजागृती केली. आता फटाके वाजवण्याचे प्रमाण बर्याच प्रमाणात उणावले आहे.

२. विविध माध्यमांतून होणार् या श्रद्धास्थानांच्या विडंबनाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने सातत्याने व्यापक जनजागृती केली. त्यानंतर आता हिंदू जागृत होऊ लागल्याने ते आता स्वतःहूनच त्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत. अनेक चित्रपटांतील विडंबनाला झालेल्या विरोधावरून हे लक्षात येते.

३. हिंदूंवरील अन्याय आणि आघात यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने आवाज उठवला. या विरोधात आवाज उठवणार् यांचे संघटन केले, तसेच हिंदूंना समितीने व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

४. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सर्वप्रथम आवाज उठवून २० वर्षांपूर्वीच विविध माध्यमांतून जनजागृती करण्यास समितीने आरंभ केला. त्यानंतर अलीकडच्या काळात त्या संदर्भात हिंदू जागृत झाले आणि २ राज्यांत त्या विरोधात कायदाही करण्यात आला.

५. मंदिर सरकारीकरण, मंदिरांमधील भ्रष्टाचार, मंदिरांवरील आक्रमणे आणि आघात या विरोधात जागृती, आंदोलने करण्यासह न्यायालयीन लढाही दिला जात आहे.

६. विविध पदार्थांतील भेसळ, रुग्णालयातील भ्रष्टाचार आदी विविध मोहिमा समितीने आतापर्यंत राबवल्या आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात, तसेच समाजातील अपप्रकार दूर करण्यासाठी व्यापक मोहिमा राबवून हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या दिशेने नेणारे समाजोद्धारक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !