नागपूर येथे भागीदाराची १२.२७ लाखांची फसवणूक !

नागपूर – भागीदाराच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून संयुक्त खात्यातील बँकेतून ३१ धनादेशांद्वारे ९ लाख ४८ सहस्र रुपये काढले. शिवाय १६ चलनांद्वारे स्वत:च्या खात्यात २ लाख ७९ सहस्र ४२६ रुपये वळते केल्याप्रकरणी शहरातील मानकापूर पोलीस ठाण्यात ६ जुलैच्या रात्री भागीदार देवयानी लांडगे आणि त्यांचे पती नवनीत लांडगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. झिंगाबाई टाकळी येथे रहाणारे तक्रारदार शिवकुमार तिवारी आणि संशयित देवयानी लांडगे यांची भागीदारीत ‘श्रीराम लँड डेव्हलपर्स’ नावाने आस्थापन आहे. श्रीराम को.ऑप. बँकेच्या गोधनी शाखेत फर्मचे ‘जॉइंट अकाऊंट’ होते. याच बँकेत नवनीत लांडगे हे रोखपाल म्हणून काम करतात. देवयानी आणि नवनीत यांनी संगनमत करत फर्मच्या संयुक्त खात्यातून शिवकुमार तिवारी यांच्या खोट्या स्वाक्षरी करून वरील रक्कम काढली.