गोवंशियांची अवैध वाहतूक करू नये ! – सोलापूर पोलीस

प्रातिनिधिक छायाचित्र

सोलापूर – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुणीही गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करू नये, तसेच गोवंशीय प्राण्यांचा बळी देऊ नये. अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधावा. विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गोवंशियांची वाहतूक करणारी वाहने स्वत: न अडवता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कुठेही घाण पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, स्वच्छतेचे पालन करा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी थेट संवाद साधावा. कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे.