म्हैसाळमधील हत्याकांड म्हणजे ‘मांत्रिक जिहाद’ ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

सांगली – मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील ९ जणांची हत्या करण्यात आली. वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हे हत्याकांड म्हणजे ‘मांत्रिक जिहाद’च आहे. म्हैसाळमधील हत्याकांडामागे मांत्रिकांची टोळी कार्यरत आहे. याचप्रकारे राज्यभरात मांत्रिकांच्या टोळ्या कार्यरत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’चे संस्थापक श्री. नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.

श्री. चौगुले पुढे म्हणाले, ‘‘सावज शोधून फसवणे, त्यांच्याकडून पैशांची वसुली करणे आणि पैशांचे वितरण करणे, अशी साखळी कार्यरत आहे. याचा कायमचा बंदोबस्त पोलिसांनी करावा.‘हनी ट्रॅप’द्वारे तरुणांना ‘ब्लॅकमेल’ करण्याचे प्रकार वाढले असून या संदर्भातही आम्ही आवाज उठवणार आहोत. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून निवेदन दिले असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटणार आहोत.’’