८ मंत्र्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी १ लाख रुपये जमा करा ! – उच्च न्यायालय

ही याचिका सकृतदर्शनी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.

पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळाची दुर्दशा; वाड्याच्या प्रवेशद्वाराची भिंत कोसळली !

ज्या क्रांतीकारकांनी देशासाठी बलीदान दिले, त्या क्रांतीकारकांच्या स्मारकाची अशी दुरवस्था, म्हणजे त्यांच्या कार्याचा अनादर केल्यासारखेच आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमाचे आणि त्यागाचे स्मरण जागृत ठेवण्यासाठी, भावी पिढीला प्रेरणा देणार्‍या क्रांतीकारकांच्या स्मृतीस्थानाचे जतन…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांना जिवे मारण्याची धमकी !

या पत्रात लिहिले आहे की, देशातील युवक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाहीत. तुम्ही केवळ तुमच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावे.

पालखी सोहळ्यात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे आवश्यक ! – अधिवक्ता विकास ढगे पाटील

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाढत चालला असून प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणची जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे वाढीव जागेची मागणी शासनाकडे केली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीवर प्रशासक येणार !

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ येत्या ३ जुलैला संपत आहे. त्यापूर्वी नवे पदाधिकारी नेमले न गेल्यास समितीवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

सिंहगडासारख्या पवित्र ठिकाणी मध्यरात्रीही प्रेमीयुगुलांचा मुक्त संचार !

ज्यांनी गडाला जिंकण्यासाठी स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा विचार मागे ठेवून लढता लढता वीरमरण पत्करले, त्या वीर तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने पवित्र झालेल्या सिंहगडावर येऊन अनेक युवक-युवती अश्लील चाळे करतात, हे लज्जास्पद आहे.

राज्यातील २७१ ग्रामपंचायतींची निवडणूक ४ ऑगस्टला होणार ! – निवडणूक आयोग

राज्याच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित केली आहे. ५ जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे. ४ ऑगस्ट या दिवशी मतदान होणार असून ५ ऑगस्टला मतमोजणी होईल.

वारकर्‍यांना न्याय कधी ?

हिंदूबहुल देशात प्रत्येक वेळी अल्पसंख्यांक आणि त्यांच्या यात्रांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो आणि वारकरी मात्र उपेक्षित रहातात. भारतातील एकूणच व्यवस्था ‘सेक्युलर’ असल्यानेच असे होते. वारकर्‍यांसह हिंदूंच्या प्रत्येक यात्रेला न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !