स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांना जिवे मारण्याची धमकी !

स्वरा भास्कर

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद विधान केल्याच्या प्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्कर यांना जिवे मारणाच्या धमकीचे पत्र आले आहे. वर्सोवा येथील रहात्या घरी त्यांना हे पत्र मिळाले असून त्यांनी याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

या पत्रात लिहिले आहे की, देशातील युवक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाहीत. तुम्ही केवळ तुमच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावे.

पत्रात आणखी काही आपत्तीजनक लिखाण केले आहे. पत्राच्या शेवटी ‘देशाचा युवक’ अशी स्वाक्षरी करण्यात आली आहे. स्वरा भास्कर यांनी वर्ष २०१७ मध्येही सावरकर यांच्याविषयी खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर सामाजिक प्रसारमाध्यमावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.