भिवंडी येथे २१ किलो गांजा जप्त !

एका धर्मांधाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ३० जून (वार्ता.) – भिवंडी येथील कामतघर भागात ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २१ किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत ३ लाख १५ सहस्र रुपये इतकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी हसन शेख (वय २१ वर्षे) याला अटक केली असून त्याच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अमली पदार्थांच्या व्यवसायात बहुतांश वेळा धर्मांधच कसे असतात ? – संपादक)