गौंडवाड (जिल्हा बेळगाव) येथे युवकाच्या हत्येनंतर हिंसाचार !

सतीश पाटील यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने काही वाहने, तसेच काही घरे यांना आग लावून दिली. या प्रकरणी हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी ४ लोकांना, तर आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.

आषाढी वारीनिमित्त सोलापूर रेल्वे विभागाकडून १० दिवसांत १२५ विशेष फेऱ्यांचे नियोजन !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुणे-पंढरपूर, कुर्डूवाडी-मिरज, लातूर-मिरज, भुसावळ-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, बिदर-पंढरपूर आदी मार्गांवर विशेष रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांमध्ये सर्वसामान्य (जनरल) तिकिटावर वारकऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण !

गेल्या दोन दिवसांपासून कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. २१ जूनच्या रात्री चाचणीतील अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला.

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ !

या वेळी दिंडी प्रमुखांना पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रथमोपचार पेटी, महापालिका प्रशासन आणि त्यांचे संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका, मूल्यशिक्षण अभ्यासपुस्तिका भेट देण्यात आली.

माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त ‘ज्ञानियाचा राजा’ कार्यक्रमाचे आयोजन !

श्री मारुतिबाबा कुर्हेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. दोन्ही दिवशी हरिपाठाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दोन दिवशी व्याख्यान, कीर्तन, भारुड, अभंगगीत, भजन विराणी, ओडिसी नृत्य, गवळण, ओवी, दिंडी आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले.

(म्हणे) ‘धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणाऱ्यांपासून दूर रहा !’

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीवरून गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांना पोटशूळ !

पंचांगातील ‘ महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होतील’, हे भविष्य खरे ठरले !

भारतीय पंचांग हे भविष्याचे अचूक वेध घेणारे शास्त्र आहे. पंचांगामध्ये वर्तवले जाणारे भविष्य हे नेहमीच दिशादर्शक असते. यंदाही जून मासाच्या पंचांगात वर्तवण्यात आलेल्या भविष्यामधील अनेक भाग सत्य होतांना दिसत आहेत.

आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातय !

गोव्यात सध्या भूमी घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. एकीकडे हा गदारोळ चालू असतांनाच पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याच्या संचालिका ब्लोसम मेडेरा यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांना हटवणे आणि मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्यात काही शासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचे सांगणे, याला योगायोग म्हणायचा का ?

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

या प्रसंगी श्री. महाडिक यांना सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

हडपसर येथे २ सहस्र ५०० किलो गोमांस पकडले !

गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता !