आळंदी, २२ जून (वार्ता.) – सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १८ आणि १९ जून या दिवशी संत ज्ञानेश्वर यांचे ७२५ वे संजीवन समाधी वर्ष अन् संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे ७२५ वे निर्वाण वर्ष यानिमित्त आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे ‘ज्ञानियाचा राजा’ या आध्यात्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. श्री मारुतिबाबा कुर्हेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. दोन्ही दिवशी हरिपाठाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दोन दिवशी व्याख्यान, कीर्तन, भारुड, अभंगगीत, भजन विराणी, ओडिसी नृत्य, गवळण, ओवी, दिंडी आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.