भारताचे महत्त्व !

‘पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’

‘राष्ट्रीय अचिव्हमेंट’ सर्वेक्षणात राज्यात कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सोलापूर अव्वल !

देशभरात घेण्यात आलेल्या ‘नॅशनल अचिव्हमेंट’ सर्वेक्षणा’त संपूर्ण भारतातील ७२० जिल्ह्यांमधील १ लाख ८ सहस्र शाळांमधील ३४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले.

देशसेवेसाठी जीवन समर्पित करणारे अधिकारी निर्माण व्हावेत ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

एक श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ आणि कार्यप्रवण लोकांची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन समाजातील आर्थिक दुर्बल, उपेक्षित घटकांतील विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी सिद्ध करण्याच्या उद्देशाने ‘स्पार्क अकॅडमी’चा प्रारंभ केला आहे.

नीमच (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

या प्रवचनाचा समारोप करतांना कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा यांनी संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याविषयी उपस्थितांना सांगितले.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठीच्या कार्यशाळा पार पडल्या !

कार्यशाळांमध्ये उपस्थित सर्व जिज्ञासूंनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये साधनेविषयी श्रद्धा आणि तळमळ वाढण्यास साहाय्य झाले.

राज्यात विजेची मागणी वाढल्याने भारनियमन अटळ ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

‘महावितरण’ला ७५ टक्के वीज ही औष्णिक विद्युत् प्रकल्पातून उपलब्ध होते. सध्या कोळसा टंचाईमुळे ‘महावितरण’ला ६ सहस्र मेगावॅटची आवश्यकता भासत आहे. परिणामी ‘महावितरण’ला खुल्या बाजारातून महागडी वीज खरेदी करावी लागत आहे.

उजनी धरणातील ‘फेकल केलिफॉर्म’ या घातक जिवाणूचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी !

धरणात सोडण्यात येणार्‍या पाण्यावर नियमानुसार शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात यावी. या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून सहस्रो नागरिकांच्या जिवावर बेतलेल्या या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

पुणे जिल्ह्यातील मेपर्यंत ९०४ बालके कुपोषणमुक्त करण्यात यश !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बालके कुपोषित असणे, दुर्दैवी आणि गंभीर आहे. प्रशासनाने ‘एकही बालक कुपोषित नको’, असे ध्येय घेणे अपेक्षित आहे.

ज्योतिषशास्त्र हे जीवनासाठी दिशादर्शक ! – भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

ज्योतिष हे अनुभवशास्त्र आहे. माझ्या आई-वडिलांचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. ज्योतिषशास्त्रामुळे अनेकांचे शंकानिरसन तर होतेच, तसेच शिवाय समाजाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

कोरोनाविषयक वार्ता

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते सध्या घरीच विलगीकरणात असून त्यांच्या संपर्कात असलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे.