
नीमच (मध्यप्रदेश) – येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (चतुर्थ सिग्नल बटालियन) सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे श्री. किरण नोगिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रवचनासाठी कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा, त्यांचे अधिकारी आणि सैनिक उपस्थित होते. उपस्थित सैनिकांनी अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेत संस्थेच्या संकेतस्थळाविषयी जाणून घेतले. या प्रवचनाचा १०० हून अधिक सैनिकांनी लाभ घेतला. या प्रवचनाचा समारोप करतांना कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा यांनी संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याविषयी उपस्थितांना सांगितले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !