‘राष्ट्रीय अचिव्हमेंट’ सर्वेक्षणात राज्यात कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सोलापूर अव्वल !

कोल्हापूर – देशभरात घेण्यात आलेल्या ‘नॅशनल अचिव्हमेंट’ सर्वेक्षणा’त संपूर्ण भारतातील ७२० जिल्ह्यांमधील १ लाख ८ सहस्र शाळांमधील ३४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनानुसार राज्यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे अव्वल आहेत. यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

वर्ष २०२१ मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात राज्यातील ३ री, ५ वी, ८ वी आणि १० वी मधील ७ सहस्र २२६ शाळांमधील २ लाख १६ सहस्र ११७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्यात तिसर्‍या वर्गात सिंधुदुर्ग जिल्हा (७३.२ टक्के), ५ व्या वर्गात सोलापूर जिल्हा (६०.७ टक्के), ८ व्या वर्गात कोल्हापूर जिल्हा (५०.८ टक्के) राहिला आहे. ‘राष्ट्रीय अचिव्हमेंट’ सर्वेक्षणात इयत्ता ३ रीच्या ९९ टक्के, तर ५ वी, ८ वी आणि १० वीच्या ९८ टक्के विद्यार्थ्यांना शाळेत जाणे आवडत असल्याचे निदर्शनास आले आहे.