कोरोनाविषयक वार्ता

शाळांसाठी कोरोनाविषयीची नवीन नियमावली घोषित करणार ! – शिक्षणमंत्री

मुंबई – शाळांमध्ये मास्कसक्ती करायची कि नाही ? याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल, तसेच शिक्षण विभाग शाळांसाठी कोरोनाविषयीची नवीन नियमावली घोषित करणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ५ जून या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना दिली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून वेगवेगळ्या उपाययोजना चालू केल्या आहेत. ‘आवश्यक ती काळजी घेऊन शाळा चालू ठेवू’, असे या वेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना !

मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते सध्या घरीच विलगीकरणात असून त्यांच्या संपर्कात असलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे.


करण जोहर यांच्या मेजवानीतून कोरोना पसरला

मुंबई – दिग्दर्शक करण जोहर यांनी वाढदिवसानिमित्त मेजवानी दिली होती. त्यात सहभागी झालेले अभिनेते शाहरूख खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर, तसेच अभिनेत्री कतरिना कैफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.