एन्.आय.ए.कडून मिझोराममध्ये छापे
येथे काही मासांपूर्वी भारत आणि म्यानमार यांच्या आर्थिक चलनासह मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए’ने) ऐझवाल, चंपाई आणि कोलासिब या जिल्ह्यांमध्ये छापे टाकले.
येथे काही मासांपूर्वी भारत आणि म्यानमार यांच्या आर्थिक चलनासह मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए’ने) ऐझवाल, चंपाई आणि कोलासिब या जिल्ह्यांमध्ये छापे टाकले.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी फलक (बॅनर) लावले असतांनाच, त्यापाठोपाठ २५ जूनला सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणा दिल्या.
‘शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है’, यांसह अन्य घोषणा देत शिवसैनिकांनी २४ जून या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात भव्य मोर्चा काढला.
३ वर्षांपूर्वी सूरज हे सैन्यात भरती झाले होते. त्यांचे पहिलेच स्थानांतर लेह-लडाख येथे झाले होते. तेथेच कर्तव्य बजावत असतांना सैन्याच्या ‘ऑपरेशन रक्षक’मध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी (तालुका हातकणंगले) येथील पथकर नाक्यावरील खासगी आस्थापनाचा पथकर वसुलीचा कालावधी २४ जून या दिवशी संपला. आता हा महामार्ग आणि पथकर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला आहे.
समाजातील नैतिकता दिवसेंदिवस किती खालावत आहे, हे दर्शवणारी घटना !
या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
पालखी मार्गावर हरित वारी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे कर्मचारी, गटविकास अधिकारी आणि उमेद अभियानातील तालुका स्तरावरील समन्वयक यांची ‘ऑनलाईन’ बैठक घेतली.
सध्या रुढीप्रिय झालेले अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय ‘समलैंगिक विवाह’, ‘गर्भपातासाठी अनुमती’ यांसारख्या प्रगतीशील निर्णयांचाही फेरविचार करू शकते. यावरून अमेरिकेत नीतीमत्ता, सुसंस्कृतपणा यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, असेच म्हणावे लागेल !
एकल उपयोग प्लास्टिक बंदीसाठीच्या जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘नियोजन भवन’ येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते.