तुकोबा आणि माऊली यांच्या पालखीत चोर्‍या करणार्‍या ६० आरोपींना अटक !

पिंपरी (जिल्हा पुणे) – तुकोबा आणि माऊली यांच्या पालखीत गर्दीचा अपलाभ घेऊन चोर्‍या करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या २२५ संशयितांना कह्यात घेण्यात आले होते. त्यांतील ६० आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या चोर्‍यांमध्ये आरोपींनी जवळपास साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरले होते. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. यातील बहुतांश आरोपी नगर, बीड, लातूर या भागांतील असल्याचे पोलीस अन्वेषणात निष्पन्न झाले आहे, तसेच न्यायालयात हजर न राहिलेल्या एका पसार आरोपीसह इंद्रायणी नदीत अंघोळ करणार्‍या वारकरी महिलांची छायाचित्रे काढणार्‍या २ आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

देहू आणि आळंदी येथून प्रस्थान केलेल्या पालखीत चोर्‍या करण्यासाठी आलेल्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी ८ पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी मंगळसूत्र चोरणे, पाकीट मारणे आदी स्वरूपातील गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

संपादकीय भूमिका 

  • समाजातील नैतिकता दिवसेंदिवस किती खालावत आहे, हे दर्शवणारी घटना !
  • ही दु:स्थिती पालटण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !