
सांगली, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये आणि भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीतील मारुति चौक येथे १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘‘व्हॅलेंटाईन डे’ची पाश्चात्त्य रित सोडा’, ‘हिंदु संस्कृतीचे आचरण करा’, ‘धर्माचरण करा, धर्माचरण करा, भारतीय संस्कृतीचे आचरण करा !’ ‘‘व्हॅलेंटाईन डे’ या पाश्चात्त्य विकृतीला हद्दपार करा’, ‘पाश्चात्त्य कुप्रथा बंद करा’, अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. ऐश्वर्या वांढरे यांनी केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन पवार, भाजपचे नगरसेवक श्री. सुब्राव मद्रासी यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, कु. प्रतिभा तावरे, श्रीमती मधुरा तोफखाने यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हरिदास कालिदास, भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर सनातन संस्थेच्या डॉ. मृणालिनी भोसले यांसह २० हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री