- सामाजिक जीवनातील प्रत्येक क्षेत्राचे झालेले पाश्चात्तीकरण थांबवून त्याचे भारतीय संस्कृतीनुसार संस्कृतीकरण करणे आवश्यक आहे ! हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक असे दिवस साजरे केले जातील ! – संपादक
- मेकॉलेप्रणीत पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! युवकांना ध्येयापासून दूर नेणारी आणि चंगळवादी बनवणारी पाश्चात्त्य ‘डे’ प्रथा बंद करण्यासाठी आतापर्यंतच्या सरकारच्या शिक्षण विभागाने पावले न उचलणे लज्जास्पद ! – संपादक
- महाविद्यालय हे शिक्षण घेण्याचे माध्यम असतांना तिथे ‘प्रपोज डे’ (मागणी घालण्याचा दिवस) साजरा होणे, हे काही सुदृढ शिक्षणव्यवस्थेचे लक्षण नव्हे ! – संपादक
|
नाशिक – निफाड येथील पिंपळगाव रस्त्यावरील कर्मवीर गणपत मोरे महाविद्यालयाच्या आवारात ‘प्रपोज डे’च्या (प्रियकर अथवा प्रेयसी यांना प्रेम स्वीकारण्याची मागणी घालण्याचा दिवसाच्या) पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत वाद होऊन नंतर मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. ८ फेब्रुवारीला ही घटना घडली. निफाड पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. येथील डोंगरे वसतीगृहातील तरुणींमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओही काही दिवसांपूर्वी प्रसारित झाला होता.