‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून निवेदने !

तहसीलदार संदीप थोरात (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मुंबई, १२ जानेवारी (वार्ता.) – येथे ‘व्हॅलेंटाइन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन समितीच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार संदीप थोरात यांना देण्यात आले. या वेळी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये जागृती !

१. महाविद्यालयीन युवकांमध्ये जागृती व्हावी यासाठी मुलुंड येथील ‘मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स’ येथे निवेदन देण्यात आले. महाविद्यालयाच्या डॉ. सोनाली पेडणेकर यांनी निवेदन स्वीकारले आणि या विषयासंदर्भात जागृती करणारे पत्रक सूचना फलकावर लावण्यास अनुमती दिली.

२. भांडुप येथील ‘जनता क्लासेस’ या शिकवणीवर्गाचे श्री. वसिष्ठ चौबे यांना या विषयी माहिती सांगून यासंदर्भात जागृती करणारे पत्रक सूचना फलकावर लावण्यात आले.

निवेदन स्वीकारतांना (डावीकडे) मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सच्या डॉ. सोनाली पेडणेकर

अमरावती येथे जिल्हाधिकारी,पोलीस प्रशासन आणि कुलगुरु यांना निवेदन !

अमरावती, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष बिजबळ, पोलीस आयुक्त श्रीमती आरती सिंह आणि जिल्हा अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शशिकांत सातव यांना देण्यात आले.

अमरावती विद्यापिठाचे कुलगुरु श्री. दिलीप मालखेड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. पी.एम्. कवचे यांनाही विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी निवेदन देण्यात आले. ही सर्व निवेदने देतांना धर्मप्रेमी सर्वश्री रोशन ठोसर, चेतन माहुलकर, विमल पांडे, विनायक लांजेवार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आनंद डाऊ, गिरीश जामदे, संजय चौधरी उपस्थित होते.

निवेदन दिल्यावर ‘आम्ही यानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी अध्यादेश काढतच असतो’, असे पोलीस आयुक्त श्रीमती आरती सिंह म्हणाल्या.

जिल्हाधिकारी आशिष बिजबळ यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी सर्वश्री विनायक लांजेवार, रोशन ठोसर, चेतन माहुलकर आणि विमल पांडे

पोलीस प्रशासनाला निवेदन !

‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्याविषयी काळाचौकी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. या वेळी फौजदार जाधव यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदन स्वीकारतांना काळाचौकी पोलीस ठाण्याचे फौजदार जाधव

गेल्या काही वर्षांपासून १४ फेब्रुवारी या दिवशी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतात चालू झाली आहे. व्यावसायिक लाभासाठी भारतात प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे आजची युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडत आहेत. या दिवसांत युवा पिढीकडून धुम्रपान, मद्यपान करण्यात प्रचंड वाढ होते. या दिवसात संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत आणि महिलांशी संबंधित अपरांधामध्येही मोठी वाढ झालेली लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे शाळा-महाविद्यालयांतील युवावर्ग त्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील अशा कालखंडात अशा या अपप्रकारांना बळी पडत आहे. अनेकदा ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आडून ‘लव्ह जिहाद’चे प्रकार उघडकीस आले आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’चे दुष्परिणाम लक्षात घेता हे ‘डे’ साजरे करू नयेत, तसेच यामुळे होणार्‍या अपप्रकारांवर आळा घालावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.