नाशिक जिल्ह्यात २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश !
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांसह तब्बल २७ काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.