नाशिक जिल्ह्यात २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश !

नाशिक – जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांसह तब्बल २७ काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. राज्यात ३ पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारे नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये अप्रसन्नता आहे.