नागरिकांमध्येही राष्ट्रभावनेचा अभाव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयत्व, राष्ट्रध्वजाप्रती आदर, राष्ट्रकर्तव्य यांचा अभाव दिसून येणे हे देशाला लज्जास्पद नव्हे का ? – संपादक
मुंबई – एका शहरातील टपाल (पोस्ट) कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘७५’ या आकड्याची रांगोळी काढून त्यात तिरंग्याचे रंग (केशरी, पांढरा, हिरवा) भरले होते. त्यावरून ये-जा करू नये, यासाठी ‘७’ या आकड्यावर कुंड्या ठेवल्या होत्या; मात्र तेथून ये-जा करणारे लोक ‘५’ या आकड्यावर पाय देऊन जात होते. ना कुणाच्या मनात राष्ट्रप्रेम होते, ना राष्ट्रध्वजाप्रतीचा आदर होता. कार्यालयानेही रांगोळीवर कुंड्या ठेवून राष्ट्रध्वजाचा अनादर केला. (शेजारील चित्र प्रसिद्ध करण्यात कुणाचाही भावना दुखावण्याचा हेतू नाही. – संपादक)