सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० सहस्रांहून अधिक

(प्रतिनिधिक छायाचित्र)

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण आढळले, तर ५ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४२९ झाली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र ८३ झाली आहे. सद्य:स्थितीत ९१४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ८ ऑक्टोबर या दिवशी ८७ जण कोरोनामुक्त झाले.