सावंतवाडी – आंबोली येथील पोलीस तपासणी नाक्यावर एका दुचाकी चालकाकडून पोलिसांनी चंदनाच्या लाकडाचे २० किलो वजनाचे तुकडे आणि दुचाकी कह्यात घेतली. ७ ऑक्टोबरला रात्री केलेल्या या कारवाईच्या वेळी दुचाकीचा चालक काळोखाचा लाभ उठवत पळून गेला.
सावंतवाडी-बेळगाव मार्गावरून एक दुचाकीचालक मोठी ‘बॅग’ घेऊन प्रवास करत होता. मार्गावरील आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांना संशय आल्याने त्या दुचाकी चालकाला तपासणीसाठी थांबवले. त्याच्याकडील ‘बॅगे’ची तपासणी करत असता तो दुचाकी चालक पळून गेला. पोलिसांनी कह्यात घेतलेले साहित्य आंबोली वनविभागाच्या कार्यालयात सुपुर्द केले.