मुरगाव तालुक्यात ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाला प्रारंभ
वास्को, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत गोवा सरकारच्या ३८ विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. दूध, भाज्या, फुले, फळे यांसाठी दुसर्या राज्यांवर निर्भर न रहाता गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. झुआरीनगर येथील ‘एम्.ई.एस्.’ महाविद्यालयात मुरगाव तालुक्यासाठी आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक आणि स्थानिक आमदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोवा शासनाने गोमंतकियांच्या हितासाठी एकूण १५२ योजना राबवण्यासमवेतच जनहितासाठी १२२ सेवा ‘ऑनलाईन’ स्वरूपात प्रारंभ केल्या आहेत. काँग्रेसच्या काळात अशी एकतरी योजना राबवण्यात आली असेल, तर ती त्यांनी दाखवावी, असे आव्हानही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी दिले.