मुलांना मनुष्य जन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षण दिले जात नसल्याने ते अशाश्वत गोष्टींमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे कसे महापापा आहे, हे समजण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !
येरवडा (पुणे), १६ सप्टेंबर – येथील १४ वर्षीय रिचा देवकर या शाळकरी मुलीने १४ सप्टेंबर या दिवशी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात् मृत्यू झाला, अशी नोंद केली आहे. गंभीर गोष्ट म्हणजे येरवड्यात एकाच आठवड्यात ४ आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत.