कोरोना महामारीतील संचारबंदीमुळे कदंब परिवहन महामंडळाला आर्थिक फटका

४१७ बसगाड्या बंद ठेवल्याने प्रतिदिन २० लाख रुपयांची हानी सोसावी लागली !

१६ सहस्र लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास पूर्ण देयक लागू होईल ! – सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अधिसूचना प्रसारित

प्रत्येक कुटुंबाला मासिक १६ सहस्र लिटर विनामूल्य पाणीपुरवठा करण्याची योजना १ सप्टेंबरपासून चालू करण्यात आली; मात्र १६ सहस्र लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास पूर्ण देयक भरावे लागणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रसारित केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार  

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ३ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेला घोटाळा आणि संचयनी इन्व्हेस्टमेंटचा घोटाळा यांचा पाठपुरावा करण्यासाठी ते येत आहेत.

तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !

‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’ हे शासन आणि समाज यांचे कर्तव्य बनते.

कसाल येथे मद्यासह ७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात

प्रतिदिन मद्याची अवैध वाहतूक रोखल्याची एकतरी बातमी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होते; पण ही अवैध वाहतूक कायमची रोखण्यासाठी आणि अशी वाहतूक पुन्हा करण्यास कुणी धजावू नये, यासाठी प्रशासन कोणतीही उपाययोजना करतांना दिसत नाही.

कुडाळ शहरातील सर्व गणेशघाटांची स्वच्छता करा ! – राकेश कांदे, शहराध्यक्ष, भाजप

या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील सर्व गणेशघाटांची स्वच्छता करण्यासह सर्व पथदीप सुस्थितीत ठेवण्यात यावेत.

अशाने भ्रष्टाचार संपणार का ?

राज्यात तब्बल २०४ लाचखोर अजूनही उजळ माथ्याने शासनाच्या सेवेत आहेत, यासारखे दुर्दैव आणखी कोणते ? यापेक्षा गंभीर म्हणजे लाचखोरीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतरही २९ जणांना शासनाने अद्यापपर्यंत सेवेतून बडतर्फ केलेले नाही.

सावंतवाडी येथे नवविवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणी पती, सासू आणि सासरे यांना पोलीस कोठडी

सौ. निधी पास्ते यांनी ३१ ऑगस्टच्या रात्री सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील एका इमारतीत गळफास लावून आत्महत्या केली होती.

यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित केले पाहिजे. जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हा देशाचे कल्याण होईल, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडले आहे.

आळस टाळण्यासाठी करावयाचे उपाय

आळस न येण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत ? ‘पचायला जड असणारे पदार्थ खाल्ल्याने ग्लानी येऊन झोप येते आणि शरिरातील आळस वाढतो. त्यामुळे खालील पदार्थ खाणे टाळावे.