२० सहस्र माथाडी कामगारांचे लसीकरण करणार ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वतीने राबवला जाणारा माथाडी कामगारांचे विनामूल्य लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशन यांच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.

देश आणि हिंदु धर्म यांच्याविरुद्ध दुष्प्रचार करणारी ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ ही आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषद रहित होण्यासाठी प्रयत्न करा !

हिंदु जनजागृती समितीची स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देऊन केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्याकडे मागणी

लहान मुलांना सकस आणि पोषक आहार मिळावा यांसाठी पालकांमध्ये जागृती करावी ! – सौ. स्वाती शिंदे, नगरसेविका

समाजातील गरीब कुटुंबातील मुले अंगणवाडीत येतात. अंगणवाडी सेविका या मुलांना घडवण्याचे आणि वाढवण्याचे कार्य करतात. या मुलांच्या पोषणासाठी सरकार धान्य, शक्तीवर्धक औषधे यांचा पुरवठा करते.

घरगुती सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्रशासनाकडून ४० टक्के अनुदान मिळणार !

यामध्ये ‘नेटमिटरींग’द्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज विकत घेतली जाणार आहे.

भुदरगड तालुक्यातील (जिल्हा कोल्हापूर) मेघोली तलाव फुटल्याने झाली पिकांची हानी आणि एक महिला गेली वाहून !

तलाव फुटल्याने मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावांची मोठी हानी झाली आहे. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर चालू आहे. तलाव फुटण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पाटबंधारे प्रकल्पांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार

जलसंपदा मंत्री जिल्ह्यात येऊन पाटबंधारे प्रकल्पांच्या समस्या जाणून घेणार हे चांगलेच आहे; मात्र सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताशी असतांना मंत्र्यांना समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात यावे लागत असेल, तर या यंत्रणांचा उपयोग काय ?

सिद्धी नाईकचा खून झाला असल्याचा वडिलांना संशय : नव्याने तक्रार नोंद

‘माझ्या मुलीला बलपूर्वक पाण्यात बुडवून तिची हत्या करण्यात आली आहे’, असे संदीप नाईक यांनी कळंगुट पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सोलापूर येथे चहा पावडरमध्ये रंगाची भेसळ आढळल्याने सव्वादोन टन चहा पावडर जप्त !

या चहा पावडरचे नमुने अन्न विश्लेषकांकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येताच अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा २००६, नियम आणि नियमने २०११ नुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे साहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी सांगितले.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या ढगफुटीत नद्यांना पूर येऊन १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेली !

कधीही पूर न आलेल्या चाळीसगाव येथील ढगफुटी म्हणजे भीषण आपत्काळच होय !

पुणे येथे गटशिक्षणाधिकार्‍यासह दोघांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

सर्वच क्षेत्रांत मुरलेला भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी संबंधितांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !