हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी आणि गाझीपूर येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्रशासनाला निवेदन सादर

सध्या दुकानांमधून आणि ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगांतील ‘मास्क’ची विक्री होतांना दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे.

 वर्ष १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर पहिला तोफगोळा डागणारे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे निवृत्ती वेतनापासून वंचित !

‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’चे ५ सहस्र माजी सैनिक सुविधांपासून वंचित !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

बाजारांमध्ये ध्वजसंहितेचा अवमान होईल, असे टी शर्ट, मास्क, विक्रीसाठी आलेले आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात देण्यात आले ….

प्रसिद्धीमाध्यमे लोकशाहीचा चौथा खांब असून प्रसारमाध्यमे आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधावा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामे प्रलंबित असून त्याचा योग्य पाठपुरावा व्हावा याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली.

मुंबई विद्यापिठात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणार्‍या विद्यार्थ्याला समज देऊन पोलिसांनी सोडून दिले !

परीक्षांचा निकाल घोषित करण्यात न आल्यामुळे मुंबई विद्यापिठात बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचे ई मेल पाठवणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले आहे.

तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व सिद्धता ठेवावी ! – जयंत पाटील, पालकमंत्री

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटांपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ञांचा अंदाज असल्याने प्रशासनाने आवश्यक ती सर्व सिद्धता ठेवावी, असे निर्देश सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

कोल्हापूर येथे ‘ऑक्सिजन प्लान्ट’चा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन रुग्णालया’ला ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या १ सहस्र ८० ‘क्युबिक मीटर’ क्षमतेच्या ‘ऑक्सिजन प्लान्ट’चा शुभारंभ करण्यात आला.

…तर राज्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू करावी लागू शकते ! – उद्धव ठाकरे

१६ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करायला हवे. परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू करावी लागू शकते, अशी चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मनसेचे गजानन काळे यांच्याविरुद्धची छळवणुकीची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांचा दबाव !

गजानन काळे यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे; मात्र तीन दिवस उलटूनही काळे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे संजीवनी काळे यांनी सांगितले.

वेतनापासून वंचित ठेवणार्‍या शिक्षण संस्थाचालकांविरुद्धची कारवाई योग्यच !

‘न्यायालयाच्या आदेशानंतरही एका शिक्षिकेला कर्तव्यावर रूजू करून न घेणे आणि वेतनापासून वंचित ठेवणे हे कृत्य हेतूपुरस्सर करणार्‍या शिक्षण संस्थाचालकांविरुद्ध अवमान कारवाई योग्यच आहे’, असे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नोंदवले आहे