मुंबई विद्यापिठात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणार्‍या विद्यार्थ्याला समज देऊन पोलिसांनी सोडून दिले !

मुंबई – परीक्षांचा निकाल घोषित करण्यात न आल्यामुळे मुंबई विद्यापिठात बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचे ई मेल पाठवणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले आहे. याप्रकरणी ‘बीकेसी’ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या धमकीनंतर पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात ही अफवा असल्याचे आढळून आले. धमकी देणार्‍या विद्यार्थ्याने वाणिज्य शाखेतील पदवी परीक्षा दिली असून मानसिक तणावातून त्याने ही धमकी दिली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.