कोल्हापूर, १५ ऑगस्ट – कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन रुग्णालया’ला ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या १ सहस्र ८० ‘क्युबिक मीटर’ क्षमतेच्या ‘ऑक्सिजन प्लान्ट’चा शुभारंभ १५ ऑगस्टला जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून ८० लाख रुपये व्यय करण्यात आले आहेत. या सयंत्रामुळे कोरोना रुग्णांना तात्काळ ‘ऑक्सिजन’ उपलब्ध होणार आहे. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांसह अन्य उपस्थित होते.