हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी आणि गाझीपूर येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्रशासनाला निवेदन सादर

वाराणसी (उत्तरप्रदेश) – १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे राष्ट्रध्वज कचरा पेटी आणि रस्त्यांवर पडलेले आढळून येतात. तसेच सध्या दुकानांमधून आणि ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगांतील ‘मास्क’ची विक्री होतांना दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे. हा अवमान थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र दुबे यांना, तर गाझीपूर येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जागरण मंचाचे काशी महानगराध्यक्ष अधिवक्ता अवनीश राय, हिंदु जागरण मंचाचे काशी महानगर महामंत्री अधिवक्ता अनुराग पांडे, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता विजय सेठ, अधिवक्ता रवि प्रकाश, अधिवक्ता वीरेंद्र कुमार सिंह तथा हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.