स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

हिंदु जनजागृती समितीचे ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत निवेदन

ठाणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) – येथील बाजारांमध्ये ध्वजसंहितेचा अवमान होईल, असे टी शर्ट, मास्क, विक्रीसाठी आलेले आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर आणि कळवा पोलीस ठाणे येथे दिले. बदलापूर पोलीस ठाण्यात निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे श्री. विनीत मोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. उल्हास चौधरी उपस्थित होते, तर अन्य ठिकाणी सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.