नागपूर येथील ‘स्कूल ऑफ स्कॉलर’ शाळेने शुल्क न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांच्या घरी पाठवला !

यामुळे ३ जून या दिवशी संतप्त पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून पालकांना कुठलाही ठोस दिलासा न मिळाल्याने पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने सरकारने वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन ‘पायी वारी’च्या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग असूनही निवडणुकांच्या कालावधीत, तसेच अन्य वेळीही अनेक वेळा सूट देण्यात आली. तरी आषाढी वारीच्या निमित्तानेही समस्त वैष्णव समाज आणि वारकरी यांच्या भावना लक्षात घेऊन याविषयी सरकारने लवकर निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करावी.

पौष्टिकतेची ऐशीतैशी !

‘नेस्ले’चे ‘६० टक्के अन्नपदार्थ आणि पेय आरोग्यासाठी पौष्टिक नाहीत’, असे वृत्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर आस्थापनानेही सांगितले की, ‘कितीही सुधारणा केल्या, तरी काही अन्नपदार्थ कधीही आरोग्यासाठी हितकारक होऊ शकत नाहीत.’

विनाअनुमती साखरपुडा आयोजित केल्याप्रकरणी रिसॉर्टसह वधू-वरांच्या विरोधात गुन्हा नोंद !

विनाअनुमती आणि ५० व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ आयोजित केल्याप्रकरणी येथील ‘कांचन रिसॉर्ट’चे मालक, वर-वधू यांच्या विरोधात ४ जून या दिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अमरावती येथे संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांवर गुन्हा नोंद !

येथे ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने भरती होत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४ सहस्र ५१ वर पोचली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात १ सहस्र ४७७ जण दगावले आहेत. असे असतांना डॉ. निकम यांनी मिरवणूक काढली.

कळवा येथे धर्मांध चोराशी झालेल्या झटापटीत महिलेचा मृत्यू 

या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून फजिल शेख या सराईत चोरट्याला अटक केली आहे.

ठाणे येथे १५ जणांनी अवैधरित्या लस घेतली !

अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र सिद्ध करून तिला अवैधरित्या लस दिल्याचे उघड झाले होते. समितीच्या अन्वेषणातून अशा प्रकारे २१ श्रीमंत तरुण-तरुणींची बनावट ओळखपत्र सिद्ध केली होती. यापैकी १५ जणांनी ‘फ्रँटलाईन’ कामगार म्हणून अशा प्रकारे लस घेतल्याची समोर आले.

भायखळा येथे पोलीस हवालदाराने ५० लाख रुपयांचे दागिने चोरले !

भायखळा येथे खलील शेख या पोलीस हवालदाराने कट रचून सोन्याच्या व्यापार्‍याचे ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. या हवालदारासह चोरीत सहभागी असणार्‍या त्याच्या सहकार्‍यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

बदलापूर येथील रासायनिक आस्थापनात वायू गळती, तर भिवंडीत भंगारची १५ गोदामे जळून खाक !

बदलापूर परिसरातील लोकांना श्‍वास घेणे, डोळे जळजळणे असे त्रास होऊ लागले, तर भिवंडी येथे वित्तहानी झाली आहे.

पालघर तालुक्यात कोरोनाविषयी जनजागृती करणार्‍या पथकावर गावगुंडांचे आक्रमण !

पालघर तालुक्यातील गांजेढेकाळे आणि जायशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतून पालघर जिल्हा परिषदेचा कोरोनाविषयीची जनजागृती करणारा चित्ररथ जात होता. तेथील मद्याच्या नशेत धुंद असलेल्या १० ते १२ गावगुंडांनी रथ थांबवला आणि आक्रमणही केले