अमरावती येथे संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांवर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

अमरावती – कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू असतांनाही सेवाकाळ वाढल्याच्या कारणास्तव येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांची ढोलताशे वाजवत आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर ३ जूनच्या रात्री गुन्हा नोंद केला आहे. (संकटकाळात अशी मिरवणूक काढणे कितपत योग्य ? त्यापेक्षा हा वेळ कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी दिला असता, तर समाजसेवा तरी झाली असती ! – संपादक)

येथे ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने भरती होत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४ सहस्र ५१ वर पोचली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात १ सहस्र ४७७ जण दगावले आहेत. असे असतांना डॉ. निकम यांनी मिरवणूक काढली.