अमरावती – विनाअनुमती आणि ५० व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ आयोजित केल्याप्रकरणी येथील ‘कांचन रिसॉर्ट’चे मालक, वर-वधू यांच्या विरोधात ४ जून या दिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवसारी मंडळ अधिकारी बी.जी. गावनेर आणि तलाठी जितेंद्र लांडगे यांनी याची तक्रार दिली आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित एक व्यक्ती गृह विलगीकरणात न रहाता रस्त्यावर फिरतांना आढळल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या पथकाने या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला.