नागपूर येथे केवळ २ मासांत रस्त्यांवर २ सहस्रांहून अधिक खड्डे !

रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये व्यय करूनही ठेकेदारांकडून त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करण्यात येते. त्यामुळेच रस्त्यावर खड्डे पडतात; मात्र महापालिका प्रशासन अशा ठेकेदारांवर कोणतीही कठोर कारवाई करत नाही.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण !

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याचे प्रकरण

वैजापूर (संभाजीनगर) येथे अश्‍लील संदेश पाठवल्याप्रकरणी गटविकास अधिकार्‍याला मारहाण !

जिल्ह्यातील खुलताबाद येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांना भ्रमणभाषवरून अश्‍लील संदेश पाठवल्याच्या कारणावरून त्यांच्या कार्यालयात एका दांपत्याकडून मारहाण करण्यात आली.

गोव्यात दिवसभरात कोरोनाविषयक केवळ १ सहस्र ६९५ चाचण्या

गोव्यात १४ जून या दिवशी दिवसभरात कोरोनाशी संबंधित १ सहस्र ६९५चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २५३ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची दिवसभरातील संख्या अल्प आढळत असली, तरी चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १५ टक्के आहे.

उन्हाळ्यात सर्वाधिक वायूप्रदूषण असणार्‍या राज्यांतील १० ठिकाणांमध्ये पुण्यातील ३ ठिकाणांचा समावेश !

नैसर्गिक जंगले जाऊन इमारतींची जंगले वाढल्यामुळे वायूप्रदूषण वाढले आहे. सरकारने आतातरी ज्या ज्या कारणांमुळे वायूप्रदूषण वाढत आहे, त्यावर लवकरात लवकर उपाययोजना काढावी ही अपेक्षा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ८८८ जणांचा मृत्यू

दिवसभरात ७५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ६ सहस्र ६४५ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत.

नागपूर येथे ‘वेब सिरीज’ पाहून मुलाचे अपहरण करून हत्या !

संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेराव, ‘वेब सिरीज’चे भयानक परिणाम दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने हिंसक स्वरूपाच्या ‘वेब सिरीज’वर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे !

किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकासमंत्री

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या जातात. त्यामुळे काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा किंवा काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यास सरकारमधील प्रत्येक पक्ष मोकळा आहे.

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडला हिंदु सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे नाव द्यावे ! – अजय सिंह सेंगर, सेनाप्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

मोइनुद्दीन चिश्ती या अत्याचारी शासकाने पृथ्वीराज चौहान यांना पकडून देण्यास साहाय्य केले. त्याने असंख्य हिंदूंच्या हत्या केल्या. त्या मोइनुद्दीन चिश्ती याचे नाव मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडला देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे, याचा आम्ही निषेध करतो.

बजाज फायनान्सच्या नावाखाली डोंबिवली येथे चालणार्‍या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची धाड !

उत्तरप्रदेश राज्यातील काही साथीदारांच्या साहाय्याने हे बनावट कॉल सेंटर चालवत होती. बजाज फायनान्स आस्थापनाद्वारे कर्ज मिळवून देतो, असे आमीष दाखवून कर्ज संमत करण्यासाठी आगाऊ रक्कम भरण्यास लावून गरजूंची फसवणूक केल्याचे अन्वेषणातून समोर आले आहे.