संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेराव
‘वेब सिरीज’चे भयानक परिणाम दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने हिंसक स्वरूपाच्या ‘वेब सिरीज’वर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे !

नागपूर – येथील इंदिरा मातानगर येथे रहाणारा राज उपाख्य मंगलू चंदन पांडे (वय १५ वर्षे) या मुलाचे अपहरण आणि हत्याकांड यांचे कारस्थान सूरज शाहू (वय २० वर्षे) याने ‘वेब सिरीज’ पाहून रचल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. परिसरातील संतप्त लोकांनी या घटनेचा निषेध करत पोलीस ठाण्याला घेराव घातला. या वेळी आरोपीला कह्यात देण्याची मागणी लोकांनी केली. सूरज याने २ दिवसांपूर्वी राज याचे अपहरण करून त्याची दगडाने डोके ठेचून आणि हाताची नस कापून हत्या केली. राज याचे काका मनोज पांडे यांच्यावरील रागामुळे आणि आपल्या आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !