चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १५ टक्के
पणजी – गोव्यात १४ जून या दिवशी दिवसभरात कोरोनाशी संबंधित १ सहस्र ६९५चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २५३ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची दिवसभरातील संख्या अल्प आढळत असली, तरी चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १५ टक्के आहे. कोरोनाबाधित ९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची सख्या २ सहस्र ९३७ झाली आहे. दिवसभरात ७२० रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ५७ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ४ सहस्र ४०६ झाली आहेे.