दिवसभरात नवीन ५५० रुग्ण, तर ७ रुग्णांचा मृत्यू
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात १५ जूनला कोरोनाबाधित ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८८८ झाली आहे. ५५० नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ७५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ६ सहस्र ६४५ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. एकूण २७ सहस्र ७१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ सहस्र २५६ झाली आहे. उपचार चालू असलेल्या ४० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.