महाराणा प्रताप यांच्याकडून आपणाला पराक्रमाचा महान वारसा मिळाला ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उत्कृष्ट सेनानायक, मूर्तीमंत त्याग आणि शौर्य यांचे प्रतीक असलेल्या या महान योद्ध्याला जयंतीनिमित्त शतशः नमन ! मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या महाराणा प्रताप यांच्याकडून आपणाला पराक्रमाचा महान वारसा मिळाला, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

उल्हासनगर महापालिकेने ५०५ इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या नोटिसा बजावल्या !

उल्हासनगर येथे वर्ष १९९२ ते १९९८ या कालावधीत रेतीच्या अभावामुळे उलवा रेती आणि दगडाचा बारीक चुरा यांपासून बहुतांश इमारती बांधण्यात आल्या. अशा इमारतींचे सज्जे कोसळून अनेक जणांचे बळी गेले.

परभणी येथील लेंडी नदीला पूर आल्याने ५ गावांचा संपर्क तुटला !

१३ जूनच्या रात्री मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर आल्याने परिसरातील आरखेड, फळा, सोमेश्‍वर, घोडा, उमरथडी या ५ गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून पाणी जात असल्याने गावकर्‍यांची ये-जा बंद झाली.

आवड असणार्‍यांनी ज्ञानदानाचे कार्य करावे ! – अरविंद शहा, निवृत्त कार्यकारी अभियंता, महावितरण

संभाजीनगर येथील अरविंद शहा यांनी गरीब मुलांच्या शिकवणीसह गीतेचे ‘ऑनलाईन’ वर्ग विनामूल्य चालू केले !

मंदिरांतील पुजारी !

आधीच मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांसाठी खर्च केला जात आहे. उद्या मंदिरेच त्यांच्या कह्यात जातील, हे लक्षात घ्या !

जात प्रमाणपत्राचा सावळागोंधळ थांबवा !

नवनीत राणा यांच्या प्रकरणात आता त्यांच्या जागी दुसर्‍या उमेदवार निवडीसाठी निवडणूक लढवावी लागणार. यासाठी होणारा व्यय नवनीत राणा यांच्याकडून वसूल केला गेला पाहिजे.

यवतमाळ येथे नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कचरा टाकला !

शहरातील कचरा प्रश्‍नाशी संबंधित चालू असणारा भोंगळ कारभार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी केला जाणारा खेळच !

सांगली महापालिका क्षेत्रातील १३६ इमारती धोकादायक

सांगली महापालिका क्षेत्रात १३६ इमारती धोकादायक असून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार आतापर्यंत ५४ मालमत्ताधारकांना आपल्या इमारती उतरवून घेण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे,..

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावा !

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या वेळी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेची तक्रार नोंदवून न घेतल्याने तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका करून चौकशीची मागणी केली आहे.