देशामध्ये मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला जात आहे ! – एन्.आय.ए.

नवी देहली – देशात २६ / ११ सारखे मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला जात आहे, अशी माहिती देणारा दूरभाष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ने) आल्याने या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे. हा दूरभाष बंगालमधील रानाघाट येथून आल्याची माहिती समोर आली आहे. दूरभाषवरून माहिती देणार्‍याने सांगितले की, या आक्रमणासाठी स्टील बुलेट आणि बॉम्ब हे नेपाळ अन् बांग्लादेश यांमार्गे तस्करी करून आणण्यात आले आहेत.


गेल्या वर्षी २० ऑक्टोबरलाही अशा प्रकारचा दूरभाष आला होता. त्या वेळी दूरभाष करणार्‍या व्यक्तीने ती पाकच्या कराची शहरातून बोलत असल्याचा दावा केला होता आणि मुंबई विमानतळ आणि पोलीस मुख्यालय यांवर आक्रमणाचा कट रचला जात असल्याची माहिती दिली होती.