कॅनडामध्ये तरुणाने मुसलमान कुटुंबाला ट्रक खाली चिरडल्याने चौघांचा मृत्यू

मुसलमान आवडत नसल्याने हत्या केल्याची आरोपी तरुणाची स्वीकृती

कोणत्याही धर्माचा द्वेष करणे चुकीचेच आहे; मात्र जेव्हा धर्मांधांकडून अन्य धर्मियांचा द्वेष केला जातो, त्यांना ठार मारले जाते, तेव्हा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

घटनास्थळ

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या ओंटारियो प्रांतामध्ये ६ जून या दिवशी एका मुसलमान कुटुंबाला ट्रक खाली चिरडण्यात आले. यात ४ जणांचा मृत्यू झाला, तर एक ९ वर्षांचा मुलगा गंभीररित्या घायाळ झाला आहे. पोलिसांनी २० वर्षीय आरोपी नथानिएल वेल्टमॅन याला अटक केली आहे. नथानिएल मूळचा लंडनचा रहिवासी आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी नथानिएल याला मुसलमानांचा राग येतो, तसेच ते त्याला आवडत नाहीत. याच कारणामुळे त्याने हे आक्रमण केले.