देशात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ४७५ जणांचा मृत्यू ! – केंद्र सरकार

नवी देहली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार देशात २८ मेपर्यंत कोरोनावरील लस घेतल्यानंतरही ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात सांगितले की, घरोघरी जाऊन लसीकरण करण्यापेक्षा घराजवळील केंद्रावर लसीकरण करणे चांगले ठरील.