फ्रान्सने गूगलला ठोठावला १ सहस्र ९५३ कोटी रुपयांचा दंड !

ऑनलाईन विज्ञापनांच्या बाजारपेठेत नियम डावलून एकतर्फी वर्चस्व निर्माण केल्याचा ठपका !

पॅरिस (फ्रान्स) – ऑनलाईन विज्ञापनांच्या बाजारपेठेत नियम डावलून एकतर्फी वर्चस्व निर्माण केल्याच्या प्रकरणी फ्रान्स सरकारने गूगल आस्थापनाला १ सहस्र ९५३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फ्रान्सच्या ‘मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटर’ने गूगलवर ही कारवाई केली.
‘मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटर’ने म्हटले आहे की, गूगलच्या विज्ञापनाच्या पद्धती भयानक आहेत; कारण गूगल बाजारातील त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे. एक प्रमुख बलाढ्य आणि वर्चस्व असणार्‍या आस्थापनाचे दायित्व असते की, त्याच्याकडून इतरांच्या हिताकडे दुर्लक्ष होणार नाही; मात्र गूगल विविध पद्धती वापरून प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अन्यायकारक स्पर्धा करत आहे.